सार्वजनिक नवरात्रोत्सव २०१८

>> ऑनलाईन परवाना मिळवण्याची पद्धत

 • अध्यक्ष / पदाधिकारी SMS OTP पडताळणी
 • मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने अकाउंट बनवणे
 • अर्ज भरताना शक्यतो डेस्कटॉप कॉम्पुटरचा व अद्ययावत Browser चा वापर करावा.
 • युजर नेम हा अर्जदाराचा मोबाईल क्रमांक असेल व पासवर्ड आपण निवडल्याप्रमाणे ठेवता येईल.
 • अर्ज ऑनलाईन भरताना फक्त इंग्रजी (English) मधेच भरावा.
 • अर्ज टप्प्या टप्प्याने भरता येईल कुठेही काही तांत्रिक अडचण आल्यास याची मदत होईल
 • ऑनलाईन अर्जाची पूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे.
 • मंडळाच्या पदाधिकारांचे फोटो फक्त JPG फॉरमॅट मध्ये १०० KB पेक्षा कमी साईजचे असले पाहिजेत
 • आवश्यक कागदपत्रे फक्त pdf फॉरमॅट मध्ये २०० kb पेक्षा कमी साईजची असावीत.
 • अर्ज भरल्यावर अर्ज क्रमांक नोंद करा व अर्जाची प्रत डाउनलोड करा.
 • पुढील कार्यवाहीसाठी व आवश्यकतेनुसार गरज लागल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन अथवा मनपा कडून संपर्क केला जाईल.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे
 • मंडळाचे अध्यक्ष, उपाधयक्ष, कार्याध्यक्ष, सचिव/ सरचिटणीस, खजिनदार यांचे नाव, ई-मेल, मोबाईल व फोटो
 • धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र
 • मागील वर्षीचे मनपा परवाने, पोलीस परवाने, नाहारकतपत्र

ऑनलाईन नोंदणीची मुदत संपली आहे.

अगोदर अर्ज केलेल्या मंडळांनी लॉगिन करून आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी.

वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहराचा नवरात्रोत्सव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. नवरात्रोत्सव मंडळाची परवाना प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आम्ही ही ऑनलाईन सुविधा उपलब्द करून दिली आहे. चला आपण सर्व मिळून येणारा नवरात्रोत्सव आनंदाने, सुरक्षितपणे साजरा करून पुणे शहराच्या वैभवात भर घालुयात.
डॉ़. के़. वेंकटेशम (IPS)
पुणे पोलीस आयुक्त

सौ.मुक्ता टिळक
महापौर, पुणे

श्री.सौरभ राव
आयुक्त, पुणे मनपा

ऑनलाईन नवरात्रोत्सव परवाना हा पोलीस प्रशासन व पुणे मनपा यांचा संयुक्त उपक्रम असून या माध्यमातून पुणे शहरातील मंडळाची परवाना प्रकिया सुलभ, सोपी करण्याचा आमचा मानस आहे. सर्व नवरात्रोत्सव मंडळींनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा हि विनंती.

पोलीस ठाणी

33

सहभागी पोलीस ठाणी

मनपा कार्यालये

15

सहभागी क्षेत्रीय कार्यालये

वाहतूक शाखा

16

सहभागी वाहतूक शाखा

मागील वर्षीची सांख्यिकी

1640

सहभागी गणेश मंडळे

© 2018. पुणे पोलीस | सर्वाधिकार सुरक्षित