Achievement Details

Details

निलेश घायवळ टोळीतील गुन्हेगारस अटक 

Achievment Date:02/19/2016

कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील मोका गुन्ह्यतील फरारी गुन्हेगारस अटक 

कोथरूड पोलीस ठाणे गु. र. न. २६७/२०१५ भा. द. वि. क्र. ३०७, आर्म्स आॅक्ट कलाम, ३, सह २५, मुंबई पोलीस आक्ट, कलम ३७(१) सह १३५ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधीनियम सण १९९९ चे कलम ३(१)(इई) ,३(२),३(४) या गुन्ह्यतील पाहिजे असलेला/ कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील सक्रिय सदस्य नामे. दीपक रमेश आमले, वय. ३१, रा संगम चौक, शास्त्रीनगर कोथरूड, पुणे हा सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे १ वर्ष पासून फरारी होता.
      वर नमूद फरारी आरोपी नामे. दीपक रमेश आमले, वय ३१, रा. संगम चौक, शास्त्री नगर, कोथरूड, पुणे येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी नियंत्रण पथकातील कर्मचारी. अजय बबन भोसले यांना मिळाली होती.
      त्यानुसार नमूद पथकाचे प्रभारी पो. नि. श्री. विजयसिंग गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सापला रचून वर नमूद आरोपीस दि १९/०२/२०१६ रोजी ०५/०० सचिन आंग्रे गणपती मंदिर जवळ,कोथरूड येथे पकडले
      वर नमूद आरोपी याचे विरुद्ध खंडणी शरीरा विरुद्धाचे. गुन्हे तसेच घातक शास्त्र व अग्निशस्त्रे बाळगण्याची मिळून एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यावर यापूर्वी सुद्धा मोका कायद्यान्वे कारवाई झालेली आहे.
       सदरची कमगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री. सी एच वाकडे पोलीस उप आयुक्त श्री पी आर पाटील व सहा पोलीस आयुक्त गुन्हे १  श्री राजेंद्र जोशी यांचे मार्गदर्शना खाली संघटित गुन्हेगारी विरोधी  पथक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजायसिंह गायकवाड पो उप नि नितीन खामगळ पोलीस कर्मचारी राजेंद्र चौहान दीपक खरात शंकर जांभळे वनराज पवार अविनाश मराठे सुनील चिखले विनायक जोर्कर संजय पायगुडे प्रवीण तापकीर् राजा पाटील संजय बरकडे यांनी केली आहे.


 

Click Here To See PDF

Pune Police

We believe in S-M-A-R-T policing in sync with motto of Maharashtra Police
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय".

Mr. K VENKATESHAM

Contacts

  [email protected]
  020-26126296
  020-26122880
  CP Office Pune