Achievement Details

Details

महाकाली टोळीतील गुन्हेगारांना अटक

Achievment Date:02/25/2016

महाकाली टोळीतील ३ गुन्हेगारांना दरोडा प्रतिबंधक पथक गुन्हे शाखा पुणे शहर यांचे कडून अटक.

दरोडा प्रतिबंधक पथक गुन्हे शाखा,पुणे शहर मध्ये कार्यरत असलेले पो हवा नसिर् पटेल यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती नुसार, महाकाली टोळीतील गुन्हेगार नामे अनिकेत राजू जाधव रा. रावेत गाव, देहुरोड पुणे हा त्याचे इतर २ साथीदारा सोबत शिवाजीनगर येथे आला असता त्याने त्याची सिल्वर रंगाची सेव्हलेट अविओ कार क्र अम्त -1४ अं -8442  ही कामगार पुतळा चौकात रोडच्या बाजूला पार्क केलेली आहे त्यांचे जवळ सिल्वर रंगाची २ गावठी पिस्टल आहेत. अशी बातमी मिळाल्याने दरोडा पथकाचे प्रभारी अधिकारी पो नि श्री गणपत पिंगळे व त्यांचे अधिनीसत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने बातमीच्या ठिकाणी जाउन खात्रीकरून महाकाली टोळीतील गुन्हेगार नामे  १) अनिकेत राजू जाधव रा. रावेत गाव, देहुरोड पुणे २) सुमीत गणेश पिल्ले रा सांचेति अपार्टमेंट फ्लॅट २०३ किवळे ३) राहुल विजय लोखंडे रा. फ्लॅट २०३, क्रिश छाया अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे, पुणे हे मिळून आल्याने त्यांना त्यांचे कडील मोटर कार साहित ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ दोन देशी बनावटिचे पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे मिळून आली व त्यांचे ताब्यातील आव्हीओ कार क्र अम्त -1४ अं -8442 असे एकूण २३५६००.०० रु चा मुद्देमाल  जप्त केकेला आहे व याबाबत शिवाजीनगर पो. स्टे. येथे गुन्हा दाखल केलेल आहे

               वरील आरोपी हे देहुरोड, पिंपरी, चिंचवड परिसरातील कुविख्यात महाकाली टोळीशी सम्बन्धित असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत . टाइक विरोधात पुणे शहर, पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात शरीरावीरूद्ध चे गुन्हे दाखल आहेत.

           सदरची कमगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री. सी. एच.वाकडे, पोलीस उप आयुक्त श्री. पी. आर. पाटील व सहा पोलीस आयुक्त गुन्हे -१  श्री. राजेंद्र जोशी यांचे मार्गदर्शना खाली दरोडा प्रतिबंधक पथक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, सहापो. निरीक्षक सुनील गवळी, स.पो.फौ. भंडारी, पो.हवा.नासिर पटेल, प्रदीप शितोले, निलेश पाटील, आसिफ पटेल, राहुल घाडगे, शरद कनसे ,संतोष पगार, हरीभाउ रनपिसे, दत्ता काटम, अशोक आटोळे,,सुभाष कुंभार, प

Click Here To See PDF

Pune Police

We believe in S-M-A-R-T policing in sync with motto of Maharashtra Police
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय".

Mr. K VENKATESHAM

Contacts

  [email protected]
  020-26126296
  020-26122880
  CP Office Pune